पर्यावरण प्रकल्पाचे नाव : आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management)
नमस्कार मित्रांनो या ब्लॉगमध्ये आपण आपत्ती व्यवस्थापन या बद्दल माहिती सविस्तर पणे पाहणार आहोत त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा. पर्यावरणात होणारे बदल हे दोन गोष्टींवर अवलंबून असते पहिली गोष्ट म्हणजे निसर्ग निर्मित आणि मानव निर्मित या दोन पद्धतींचे बदल आपल्या पर्यावरणाच घडत असतात तर या सर्व गोष्टी आपण "आपत्ती व्यवस्थापन" या विषयावर पाहणार आहोत.
तर मित्रांनो, हा प्रकल्प लिहिण्या आगोदर आपल्याला काही गोष्टी माहिती असणे गरजेचे आहे त्याला आपण सोप्या भाषेत प्रकल्पाचा आराखाडा देखील म्हणू शकता. हा अनुक्रम खालील प्रकारे असू शकतो.
१) प्रकल्प विषय प्रस्तावना
२) विषयाचे महत्त्व
३) प्रकल्प कार्य उद्दीष्ट
४) प्रकल्प काययपद्धती
५) निरिक्षणे
६) विश्लेशन
७) निष्कर्ष
८) संदर्भ
९) प्रकल्पाचा अहवाल
★ प्रस्तावना : २१ व्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबरच अनेक प्रकारच्या आपत्तींमध्ये सातत्याने मोठ्य प्रमाणावर वाढ होत आहे.
आपत्ती काळामध्ये बचावकार्य करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे असते. आपल्यावरही येणाऱ्या आपत्ती ह्या नैसर्गिक तर काही मानवनिर्मित असतात. आपल्या देशामध्ये सातत्याने आपत्ती मध्ये वाढ होत असल्याचे आपण पाहतच आहोत. देशामध्ये पुन्हा - पुन्हा उद्भवनाऱ्या आपत्तींविषयी सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. अलीकडच्या काळात भारताने ज्या ज्या आपत्तींचा सामना केला, त्यांच्या मागे असणाऱ्या विविध कारणांचा आणि त्या आपत्तीवर असणाऱ्या उपाययोजनांचा साखोल अभ्यास करणे आता गरजेचे झाले आहे.
★ प्रकल्पाची उद्दीष्टे : आपत्ती संकल्पना समजून घेणे. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय व कसे करावे हे जाणून घेणे. आपत्तीच्या काळात कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती घेणे. आपत्तीच्या काळात करायचे प्रथमोपचार याबाबत अधिक माहिती घेणे. आपत्ती व्यवस्थापनाबाबत माहीती लोकांना करून देणे.
★ विषयाची निवड :
आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय ? त्याची संकल्पना काय आहे हे जाणून घेणे आजच्या काळात खूप महत्वाचे आहे. आपण एकविसाव्या शतकात पदार्पण केले आहे. या युगात आपल्या समोर अनेक संकटे ठाण मांडून बसलेली आहे. मग ती नैसर्गिक असो व मानवनिर्मित अशा संकटांचा सामना करणे गरजेचे आहेत. आपत्ती काळातून बचाव करण्यासाठी येणारी आपत्तींचा सक्षमपणे सामना करण्यासाठी आपण सज्ज राहायला हवे. आपत्ती व्यवस्थापन हा त्याचाच एक भाग आहे. आपत्ती येण्यापूर्वी काय करावे अथवा आपत्तीनंतर काय करावे याचे व्यवस्थापन असले पाहिजे. म्हणूनच आपण दैनंदिन जीवनात वावरत असताना आपल्याला या गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. 'आपत्ती व्यवस्थापन' या बाबत अधिक माहिती जाणुन घेण्यासाठी मी या विषयाची निवड केली आहे.
★ आपत्ती व्यवस्थापन काळाची गरज :
नैसर्गिक आपत्ती रोखणे कोणाच्याही हातात नसते; परंतु अशा आपत्तींनंतर योग्य खबरदारी घेऊन मोठ्या प्रमाणावर होणारी हानी मात्र टाळता येऊ शकते. त्यासाठी आवश्यकता असते ती सावधगिरीची, सामंजस्याची, एकोप्याची, मानव किती हतबल आहे हे या काळात जाणवते. तथापि अशा घडून आलेल्या आपतीनंतर एकजुटीने व धैर्याने त्याला सामोरे जाऊन त्याच्याशी सामना करणे व त्यातून लवकर सावरणे यातच खरे कौशल्य आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे कार्य या काळामध्ये 'व्यवस्थापनाच्या माध्यमातून विशेष कार्य केले गेले तर अधिक परिणामकारक ठरते.' २६ जानेवारी २००१ या दिवशी गुजरात राज्याला भूकंपाचा तडाखा बसला.. आजूबाजूचा प्रदेश हि हादरला मात्र गुजरातला बसलेला भूकंपाचा तडाखा अभूतपूर्व होता. या भूकंपात जाजारो माणसांचे बळी गेले, बेघर झाले, तर जनावरांचे काय झाले हे समजलेच नाही.
जपानमध्ये वारंवार भूकंप होतात; परंतु तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी होत नाही. याचे कारण म्हणजे तेथील इमारती भूकंपाचा विचार करून विशिष्ट प्रकारच्या बांधलेल्या आहेत; तसेच याकाळामध्ये कोणत्या उपाययोजना कराव्यात धडे सर्वाना शाळेत दिले जातात. भारतातही हा उपक्रम राबविणे गरजेचे आहे. यावरून आपत्ती व्यवस्थापनाला जपानसारख्या देशात विशेष महत्त्व दिले जाते, असे लक्षात येते. आपत्ती घडून येण्यापूर्वी सतर्कतेची यंत्रणा, आणि आपत्ती काळात याची माहिती सुसूत्रीतपणे व्यवस्थापनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवता येते, त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन महत्त्वाचे आहे.
★ आपत्ती संकल्पना :
आपत्ती म्हणजे काय?
आपत्ती व्याख्या ( Disaster Meaning )
अचानक उदभवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित, आर्थिक आणि सामाजिक हानी होते, अशा संकटांना आपत्ती म्हणतात.
सजीव सृष्टीवर अचानक ओढवलेले संकट किंवा अरिष्ट, अपघात किंवा दुःखद घटना (महापूर, भूकंप, ज्वालामुखी उद्रेक, आग, वादळ - वारा, बॉम्ब स्फोट, युध्द,विज कोसळणे, रोगराई, अवर्षण, जलप्रलय, वायु गळती इत्यादी ) म्हणजेच आपत्ती होय. आपत्ती ही पर्यावरणीय विनाशकारी घटना आहे. आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी, वित्तहानी होत असते. मानवी जीवनाची जीवनपध्दती बदलविणारी आपत्ती नैसर्गिक स्वरुपाची किंवा मानवी स्वरुपाची असू शकते. आपत्तींनमुळे मानवाला मोठया प्रमाणात हानी सहन करावी लागते. त्यामुळे आपत्तीकारक घटना थांबविणे किंवा त्या आपत्तीचे नियंत्रण, व्यवस्थापन करणे गरजेचे असते.
★ आपत्ती व्यवस्थापन संकल्पना :
आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय ?
लोकसहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यांचे फार आहे आपत्ती, आपतींना तोंड तयार असणे त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजे "आपत्ती व्यवस्थापन" होय.
नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपतींमध्ये टाळण्यासाठी उपाय म्हणून आपत्कालीन नियोजन व व्यवस्थापनची जास्त गरज असते. आपत्तींनमुळे मानवाला मोठया प्रमाणात हानी सहन करावी लागते. त्यामुळे आपत्तीकारक घटना थांबविणे किंवा त्या आपत्तीचे नियंत्रण, व्यवस्थापन करणे गरजेचे असते. आपत्ती व्यवस्थापनामध्येच मानवी हित दडलेले असते. आपत्ती व्यवस्थापनामध्ये नैसर्गिक आपत्तीपासून निर्माण झालेले नुकसान भरुन काढणे, तात्काळ शक्य होऊ शकत नाही. व्यवस्थापनामध्ये आपत्ती विषयी सूचना, माहिती मिळाली तर जीवितहानी कमी होऊ शकते. आपत्ती विषयक परिस्थितीवर नियंत्रण करणे, धोकेदायक परिस्थिती निवळणे, म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय. आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्तीचा सामना करण्याची क्षमता प्राप्त करणे, त्या क्षमतेत वाढ करणे, त्यासाठी प्रतिबंधात्मक योजना आखणे, आपत्ती निवारण तसेच आपतकालीन व्यक्तीचे पुनर्वसन, पुनर्निर्माण इत्यादी घटकांचा विचार करुन कृती आराखडा करणे, योग्य सूत्रसंचालन करुन कमीत कमी वेळात मानसिक स्थैर्यता मिळवणे अपेक्षित असते.
→ १९९३ मध्ये लातुर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात तीव्र भूकंपामुळे लोकांचा मृत्यू झाला होता.
→ जुलै २००५ आठवला, की आजही मुंबईकरांच्या अंगावर काटा राहतो. कारण त्या वेळी मुसळधार पावसाने पाणी तुंबल्याने महापूर येऊन लोकांचे बळी गेले.
→ जुलै २०१४ मध्ये आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव दरड कोसळल्याने डोळ्यांदेखत उध्वस्त झाले, तेथील डोंगरकडा कोसळल्याने याच्या ढिगाऱ्याखाली अनेक माणसे गाडली गेली व मृत्युमुखी पडली.
→ नोव्हेंबर २०१५ मध्ये तामिळनाडूत झालेल्या अतिवृष्टीने अनेक लोक मृत्युमुखी पडले.
→ डिसेंबर २०१९ पासून जगभर सुरु झालेली कोरोना महामारीमध्ये लाखो लोकांनी आपले प्राण गमावले.
★ आपत्ती कशामुळे येतात :
आपत्ती ची कारणे :
१) अतिवृष्टीमुळे येणारा महापूर.
२) भूकंप, विजांचे कोसळणे, ज्वालामुखी इत्यादी.
३) जंगलांना जंगलांना लागणारी अचानक आग.
४) वाढत्या लोकसंख्येमुळे छोट्या प्रदेशात लोकांची गर्दी एकवटल्याने वाढलेली धोक्याची तीव्रता.
५) बेसुमार प्रमाणात होणारी बांधकामे.
६) पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल.
७) दंगल, गुन्हेगारी, बॉम्बस्फोट, हल्ले, आगी, अपघात इत्यादी.
★ उपाययोजना :
१) आपल्यासमोर मानवनिर्मित अथवा निरागनिर्मित आपत्तीची उद्भवण्यापूर्वी आणि उध्दभवल्यानांत आपण काय दक्षता घ्यायला हवी ते पाहूया.
२) रेडिओ, टीव्ही वर दिल्या जाणारी बातम्यांकडे सतत लक्ष ठेवा.
३) बॅटरीवर चालणारे रेडिओ व मोबाइल यांचा उपयोग करा.
४) हवामान खात्याने दिलेल्या सूचनांचे पालन करा.
५) अतिवृष्टीमुळे किंवा ढगफुटीमुळे डोंगरउतारावर दरडी कोसळतात, अशा परिस्थितीमध्ये आश्रय घेण्यासाठी डोंगराच्या पायथ्याशी थांबू नका.
६) पूर परिस्थिती निर्माण झाल्यास उंचावर थांबा, वाहत्या पाण्याच्या प्रवाहात उतरू नका.
७) भूकंपामध्ये रस्ते खचतात, जमिनीला भेगा पडतात, अशा वेळी मार्गक्रमण करताना पुढील मार्ग सुरक्षित आहे कि नाही ते पाहून मार्गक्रमण करा.
८) मदतकेंद्रे किंवा छावणीच्या ठिकाणी थांबा जेणेकरून, औषधे, अन्न, पाणी आणि प्रथमोपचार इत्यादी मदत लवकरात लवकर मिळू शकेल.
★ प्रथमोपचार :
रोजच्या जीवनात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही आपत्ती लहान असतात तर काही आपत्ती मोठ्या असतात. अचानक निर्माण होणाऱ्या आपत्तींनवर वैद्यकीय मदत मिळेपर्यंत त्वरित उपाययोजना, उपचार करणे गरजेचे असते.
★ प्रकल्पाचा अहवाल :
अशा प्रकारे आपण 'आपत्ती व्यवस्थापन' हा प्रकल्प सविस्तर पणे जाणूण घेतला आहे. या प्रकल्पामध्ये आपण आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय? कशामुळे आपत्ती उद्भवतात? यांच्यावर काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात याची माहिती आपण जाणून घेतली.
📌 महत्त्वाची सुचना : दिलेल्या प्रकल्पाची PDF Download करायची लिंक खाली आहे तेथून तुम्ही ह्याची PDF Download करू शकता.
Tags : आपत्ती व्यवस्थापन प्रकल्प | Disaster Management Project | What is Disaster | How to write Environment Project | आपत्ती व्यवस्थापन प्रकल्प कसा लिहावा | आपत्ती व्यवस्थापन प्रकल्प निरीक्षण | आपत्ती व्यवस्थापन प्रकल्प निष्कर्ष pdf | आपत्ती व्यवस्थापन प्रकल्प कार्यपद्धती | आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय